धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपालिकेच्या परिसरातील चार दुकाने मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून तांब्याच्या तारा चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, दोन चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
धरणगावातील सचिन भागवत यांचे रेणुका मशनरी रिपेरिंगचे दुकान असून या दुकानातील २१ हजारांची ७० किलोची कॉपर तार २९ फेब्रुवारीला तर ९ हजारांची ३० किलो कॉपर तार ७ मार्चला चोरुन नेली होती. यात त्यांचे ३० हजारांचे नुकसान झाले आहे. तर राजेंद्र चोरी यांच्या हितेश इलेक्ट्रिकल दुकानातील १५ हजारांची ५० किलो कॉपर तार तसेच सत्तार खान पठाण यांच्या रॉयल इलेक्ट्रिक दुकानातील ७ हजार ५०० रुपयांची २५ किलो कॉपर तार असा एकूण ५२ हजार ५०० रुपयांची कॉपर तार अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला आहे. तसेच कापुरे इलेक्ट्रिकलचे पत्रे कापून चोरट्यांनी चोरी केली आहे.
या प्रकरणी सचिन सुभाष भागवत यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आठ दिवसा पूर्वीसुद्धा हीच दुकाने चोरट्यांनी फोडली होती. दरम्यान, ७ मार्च चोरी चोरीनंतर दोन चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आहे.