जळगाव (प्रतिनिधी) शहरातील वरद व्हेटरनरी लॅबतर्फे नववर्षानिमित्त अँटीरेबीज पंधरवडा साजरा केला जाणार आहे. त्याअंतर्गत पाळीव प्राण्यांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे.
प्रभात चौकजवळ समर्थ कॉलनीतील वरद डायग्नोस्टिक लॅबतर्फे पाळीव प्राण्यांसाठी मोफत अँटीरेबीज लसीकरण केले जाणार आहे. दि.१ ते १५ जानेवारी दरम्यान नोंदणी अभियान राबविले जात असून प्रत्येकाला टोकन दिले जाणार आहे. प्रजासत्ताक दिन दि.२६ जानेवारी २०२२ पासून प्रीमियर पेट केअर क्लिनिक, गणेश कॉलनी याठिकाणी टोकन दाखवून लसीकरण करण्यात येणार आहे. जळगाव शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन वरद व्हेटरनरी लॅबोरेटरीजचे पंकज सोनवणे, किर्ती बडगुजर, डॉ.जय राजपूत यांनी केले आहे.