धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, धरणगावतर्फे दि. १ सप्टेंबर, रविवारी सकाळी ८.३० ते सायं ५. ३० या वेळेत एक दिवसीय विनामूल्य बासरीवादन कार्यशाळेचे आयोजन श्री आ.दि.जैन मंदिर सभागृह येथे होणार आहे. भारतीय संगीतामध्ये आद्यवाद्य म्हणून बासरी वाद्य पुरातन काळापासून प्रचलित आहे. सदर बासरीवादन कार्यशाळा पं.विवेक सोनार यांचे शिष्य व खान्देशातील प्रसिद्ध बासरीवादक योगेश पाटील हे घेणार आहेत.
बासरीवादक श्री.पाटील यांनी आजपावेतो जळगाव, नंदुरबार, धुळे, परभणी, पुणे, बडोदा, भोपाल यासंह दोनशेहुन अधिक बासरी वादनाच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच बासरीवादनाच्या माध्यमातून त्यांनी दहा वर्षाच्या बालकापासून ते वयाच्या नव्वद्दीत असलेले असंख्य शिष्य घडवले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना जळगाव रोटरी क्लबतर्फे संगीत क्षेत्रातील मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात येणारा मानसिक ताण, तणाव, डिप्रेशन व मनाची एकाग्रतासाठी बासरी शिकणं व बासरीद्वारे संगीत ऐकणे खुप मोलाचं असल्याचं ते पटवुन सांगतात. त्याचप्रमाणे व्यावहारिक शिक्षणाबरोबरच कलेच्या विविध शिक्षणाची देखील गरज आहे. स्पर्धेच्या युगात कला शिक्षण मानसिक शांतता मिळवून देते. या अनुषंगाने बासरी वादन विनामूल्य कार्यशाळेत युवक, युवती, महिला, पुरुष यासंह संगीत क्षेत्रातील कला रसिकांनी सहभाग घेण्याचे व नाव नोंदणीचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष राहुल जैन 7588580618, श्रेयान्स जैन, प्रतीक जैन 9970419642, निकेत जैन, सावन जैन, तनय डहाळे, पियुष डहाळे यांनी केले आहे.