धरणगाव, प्रतिनिधी – उद्योग विभागाकडून बेरोजगार तरुणांना उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरूणांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी मोफत एक दिवसीय उद्योजकता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्योग विभागाकडून आयोजित या मोफत एकदिवसीय उद्योजकता मार्गदर्शन शिबिरात मार्केट सर्वे आणि व्यवसायाची निवडी यासंदर्भातील मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच उद्योग सुरू करताना आवश्यक असणारी कागदपत्रे, शासकीय कर्ज योजनांच्या माहितीसह उद्योग, व्यवसायात यशस्वी होण्यासाठीचे बारकावे सांगितले जातील. या शिबिराची माहिती आणि सहभागी होण्या संदर्भात समीर भाटीया यांच्या 9158069944 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात 18 ते 50 वयोगटातील व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. सहभागी होण्यासाठी शाळेचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड आवश्यक असून उद्योग आधार वरील सर्व कागदपत्रं असणाऱ्या महिलांनाही एक दिवशीय मोफत उद्योजकता प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. याच प्रशिक्षण कार्यक्रमात कर्जाचे अर्ज मोफत भरून देण्यात येणार आहे हे विशेष.