धरणगाव (प्रतिनिधी) क्रीडा संकुलसाठी महाराष्ट्र शासनातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने अडीच कोटीचा निधी मंजूर झाला असून क्रीडा संकुलच्या कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया होऊन कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी दिली आहे.
अनेक वर्षापासून क्रीडा संकुल निधी अभावी धुळखात पडले होते. परंतु पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना तालुका क्रीडा संघटनेचे पदाधिकारी व भाजप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन क्रीडा संकुल पूर्ण होण्यासाठी निवेदन दिले होते. तसेच आपण तात्काळ निधी मंजूर करून द्यावा, यासाठी विनंती केली होती. यावेळी पदाधिकाऱ्यांनी किमान 5 कोटी रुपये तरी मिळावेत अशी अपेक्षा केली होती. त्यानुसार मागच्या वेळेस ५० लाख रुपये व आता 2 कोटी रुपयांच्या निधी गुलाबराव पाटील यांनी शासनाकडून मंजूर करून आणला आहे.
अनेक वर्षापासून शहरी व तालुका क्रीडा स्पर्धा या रस्त्यावर घ्यावे लागत होत्या. परंतु आता सर्वच क्रीडा स्पर्धा लवकरात लवकर तालुका क्रीडा संकुल येथे घेण्यात येतील. तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा करून अधिवेशन संपल्यानंतर ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन लवकरच क्रीडा संकुलच्या कामाला सुरुवात होणार आहे.
याबाबत माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील,अॅड. संजय महाजन, कैलास माळी सर, विजय महाजन, भानुदास विसावे, पप्पूभाऊ भावे, विलासभाऊ महाजन, चंदन पाटील, दिलीप महाजन, तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष एस.एल. सूर्यवंशी सर, वाल्मिक पाटील, यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता. बांधकाम विभागाचे क्रीडा तालुकाधिकारी गुरुदत्त सर,पी.एम. पाटील सर यांनी मागच्या वेळेस क्रीडा संकुलची पाहणी करून त्या ठिकाणी आवश्यक असलेले मैदानांचे बांधकाम विभागाकडून इस्टिमेट करून जिल्हा क्रीडा कार्यालयकडे दिले आहे. त्यामुळे आता ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने तालुक्यातील सर्वच खेळाडूंना लवकर लाभ मिळणार असल्याचेही पी.एम.पाटील यांनी सांगितले.