मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तापी नदीवरील शेळगाव बॅरेज प्रकल्पासाठी निधी असूनही काम अपूर्णावस्थेत का? असा प्रश्न आमदार एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला होता. त्यास उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्य धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. बुडीत क्षेत्रातील पुलाचे काम येणाऱ्या जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल असे उत्तर दिले.
आमदार खडसेंनी विधान परिषदेत शेळगाव बॅरेज प्रकल्पाला निधी उपलब्ध असूनही काम अपूर्ण अवस्थेत आहे. याबाबत शासनाने काय चौकशी केली? चौकशी केली असेल तर प्रकल्प अपूर्णावस्थेत असण्याची कारणे काय आहेत?. प्रकल्प अपूर्णावस्थेत ठेवणाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करणार आहे का? असा प्रश्न विचारला. त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, शेळगाव बरेज प्रकल्पाला निधी उपलब्ध असून सुद्धा काम अपूर्णावस्थेत असल्याचे अंशतः खरे आहे.
शेळगाव बॅरेजच्या मुख्य धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रकल्पात सध्यस्थितीत ६.०९८ दलघमी साठा तसेच शेळगाव बॅरेज प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्रातील २ पैकी २ पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित एका पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच धरण रेषेच्या खालील बाजूस असणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे बांधकाम भौतिकदृष्ट्या पूर्ण झाले असून बुडीत क्षेत्रातील प्रगतिपथावरील पूल जून २०२३ पर्यंत पूर्ण होईल. प्रकल्पाच्या अद्ययावत किमतीला व उर्वरित कामांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता अहवाल तयार करण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर प्रगतीत आहे, असे स्पष्ट केले.