TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

शिरसोली रस्त्यावरील १३६३ झाडांची यशस्वी लागवड; झाडांचा पहिला वाढदिवस साजरा

vijay waghmare by vijay waghmare
June 6, 2025
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जैन हिल्स परिसरात, तसेच जैन प्लास्टिक पार्क बांभोरी येथे वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच सन २०२४-२५ या वर्षात शिरसोली रस्त्याच्या दुतर्फा एकूण १३६३ झाडांची लागवड यशस्वी करण्यात आली आहे. यामध्ये उन्हाळ्यात टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा, झाडांचे संगोपन व संवर्धन यांसारखी कामे वेळापत्रकानुसार पार पाडण्यात आली असून, सध्या या झाडांची जिवंत टक्केवारी सुमारे ८५% आहे. या सर्व झाडांचा पहिला वाढदिवस आजच्या जागतिक पर्यावरण दिनी साजरा करण्यात आला.

या उपक्रमात सुरेंद्र वाणी व जळगाव सायकलिस्ट ग्रुपचे मोहन गाढे, निलेश चौधरी, राम घोरपडे, इरफान पिंजारी, भूपेश व्यास, सखाराम ठाकरे, रुपेश महाजन, प्रमोद नारखेडे, चेतन महाजन, राजेश चव्हाण, कामिनी धांडे, अजय ढेकळे, आरती व्यास, सुरजकुमार नेमाडे, यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

वन विभागाचे अधिकारी योगेश दीक्षित, उमाकांत कोळी, हरीश थोरात, भागवत तेली, अजय रायासिंग, गोकुळ सपकाळे आणि सामाजिक वनीकरण विभागातील रोहिणी थोरात यांनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या परिसरात वन्यप्राणी आणि वृक्ष संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले. हरित सेना प्रमुख प्रवीण पाटील, प्राध्यापक शिवराज पाटील, तसेच महापालिका कर्मचारी वसंत पाटील यांनी निमखेडी रस्त्याच्या दुतर्फा आणि परिसरातील मोकळ्या जागांमध्ये वृक्ष लागवड केली.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोहन गाढे यांच्या हस्ते हेलिपॅड परिसर आणि गौराई ग्राम उद्योग जवळील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी जळगाव सायकलिस्ट ग्रुप, हरित सेना, वन विभागाचे कर्मचारी आणि सुरेंद्र वाणी तसेच गांधी रिसर्च फाउण्डेशनचे समन्वयक उदय महाजन, अब्दुल भाई, गिरीश कुलकर्णी, जैन इरिगेशनच्या गार्डन विभागाचे अजय काळे, राजेंद्र राणे, व गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे वितरित करण्यात आली.

गिरीश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र नेटके, भागवत तेली, राम घोरपडे आणि मोहन गाढे यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. राजेंद्र राणे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे विक्रम अस्वार, प्रशांत सूर्यवंशी, प्रसाद सोनवणे, प्रकाश बारी व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण उपक्रम
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून २०२५ रोजी जैन प्लास्टिक पार्क, बांभोरी येथे आत्मन जैन व अभंग जैन यांच्याहस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम झाला. पर्यावरण रक्षणाच्या हेतूने आयोजित या उपक्रमात कंपनीतील सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमात डॉ. जनमेजय नेमाडे, सी. एस. नाईक, अतिन त्यागी, आर. व्ही. सरोदे, आर. एस. पाटील, डॉ. योगेश. डी. बाफना यांची उपस्थिती लाभली. आरंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध प्रजातींच्या झाडांचे रोपे लावण्यात आले. पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी, हरित क्षेत्र वाढवण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी शुद्ध वायू निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGandhi Research FoundationJain Hills celebrates World Environment Day

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
Next Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण व प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, गुरुवार ३० नोव्हेंबर २०२३ !

November 30, 2023

तक्रारीवरून महिलेचा यू-टर्न ; उद्या येते सांगून गेलेली महिला आलीच नाही !

August 31, 2025

जळगावातील हॉटेलमध्ये दोन गटात राडा ; अनिल चौधरींच्या समर्थकाने काढले पिस्तूल ! (व्हीडीओ) )

December 15, 2020

आर्मी ऑफिसर आल्याचा बनाव, ५० हुन अधिक तरुणींशी संबंध ; अटकेनंतर आरोपीने केले धक्कादायक खुलासे

April 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group