भंडारा (वृत्तसंस्था) बेघर महिलेवर मदतीच्या नावाखाली तिघांकडून सामुहिक अत्याचार करण्यात आला. एवढेच नव्हे तर, पिडित महिलेवर धारदार शस्त्राने गंभीर वार देखील करण्यात आले. पिडीत महिलेची प्रकृती चिंताजनक झाली असून तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन नराधमांना अटक केली आहे.
भंडारा जिल्ह्यात बेघर महिलेवर तीन नराधमांचा पाशवी बलात्कार केला. याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे. नागपूर रायपूर महामार्गावर कन्हाडमोह या खेडेगावात रस्त्याशेजारी गंभीर जखमी अवस्थेत दिसून आली. बलात्काकानंतर या महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अमित सार्वे आणि मोहम्मद अन्सारी या दोघांना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन तपास सुरु केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावपासून लाखनीपर्यंत सर्व सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
सुरुवातीला पीडितेला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची गंभीर अवस्था लक्षात घेत तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथेही तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. प्रचंड रक्तस्त्राव होत असल्यामुळं सुरुवातीला डॉक्टरांनी ते थांबवण्याचे प्रयत्न केले. नंतर आवश्यक असलेली कोलोस्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. अजूनही काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती आहे.
भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून आरोपी विरुद्ध कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कारधा पोलीस करत आहेत. यात संपूर्ण गुन्हांत 3 आरोपींचा समावेश असल्यानं आता फक्त 2 आरोपी भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. तर या गुन्हाची सुरुवात गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथे झाल्यानं भंडारा पोलिसांनी गोरेगाव पोलिसांना 2 संशयित आरोपींसह गुन्हाचा तपास वर्ग केला आहे. सध्या दोन्ही आरोपींना गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिलं असून फरार आरोपींचा शोध गोंदिया पोलीस घेत आहे.