धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतक महोत्सवी पी.आर.हायस्कूलचा माजी विद्यार्थी तथा शिक्षक वसंत चौधरी व जयश्री चौधरी यांचा सुपुत्र गौरव हा भारती विद्यापीठ पूणे येथील वैद्यकीय महाविद्यालयातून बी.ए.एम.एस.परीक्षा प्रथम श्रेणीसह विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाला आहे. त्याचे या यशाबद्दल संजय चौधरी, सुनील चौधरी, पंकज ठाकरे, रितेश चौधरी, भाईदास ठाकरे आदिंनी अभिनंदन केले आहे.