धरणगाव (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण परत मिळवून द्या, अशी मागणी धरणगाव भाजपच्यावतीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आज भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्याच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मागासवर्गीय आयोग तात्काळ गठीत करून ओबीसी समाजाचा Empirical Data जमा करून तात्काळ न्यायालयात सादर करावा, असे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. परंतु १५ महिने होऊन देखील राज्य सरकारने कुठलीही हालचाल केली नाही. याकाळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत वेळोवेळी राज्य सरकारशी सवांद साधून न्यायालयाच्या आदेशाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. तरी पण राज्य सरकारने दुर्लक्ष केले आणि याचाच फटका ओबीसी समाजाला बसला आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा धरणगाव तालुका आपणा मार्फत सरकारला चेतावणी देत आहे की, लवकरात लवकर यावर ठोस कारवाई करा तसे न झाल्यास भारतीय जनता पार्टी ओबीसी समाजाला सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण आम्ही मिळवूनच राहू, आमच्या ओबीसी समाजला हक्काचे आरक्षण मिळे पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
निवेदन देतेवेळी भाजप तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे, तालुकाउपाध्यक्ष पुनीलाल आप्पा महाजन, प्रकाश सोनवणे, अँड. वसंतराव भोलाने, शेखर पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, ता. सरचिटणीस ललित येवले, सुनील पाटील, नगरसेवक शरद अण्णा धनगर, गुलाबराव मराठे, सुनील चौधरी, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, राजू महाजन, शरद भोई, जुलाल भोई, अनिल महाजन, सुधाकर साळुंखे, रवी मराठे, योगेश महाजन, विक्की महाजन इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.