नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये प्रवेशासाठी मुलींचा मार्ग मोकळा झाल्यानंतर परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुलींना सी डी एस ई लेखी परीक्षा देण्याची संधी मिळाली होती. या संधीचं सोनं करत तब्बल १,००२ मुलींनी एनडीए परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एनडीए उत्तीर्ण केलेल्या मुलींची मुलाखत आणि वैद्यकीय चाचण्या होणार आहेत. या १,००२ मुलींपैकी १९ जणींची निवड केली जाईल.
देशभरातून १ लाख ७७ हजार ६५४ मुलींनी ही लेखी परीक्षा दिली होती. आजवर महिला अधिकाऱ्यांना चेन्नईमधील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून प्रशिक्षण घेता येत असे मात्र आता एनडीएचाही मार्ग मोकळा झालाय आणि त्या संधीचं मुली सोनं करताना दिसतायत
राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अजय भट्ट यांनी सांगितलं की, १४ नोव्हेंबरला ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार या परीक्षेला ५,७५,८५६ एवढे विद्यार्थी बसले होते त्यापैकी १,७७,६५४ एवढ्या मुली होत्या. एनडीए उत्तीर्ण केलेल्या मुलींची SSB मुलाखत आणि वैद्यकीय चाचण्या होणार आहेत. या १००२ मुलींपैकी 1१९ जणींची निवड केली जाईल.