छत्तीसगढ (वृत्तसंस्था) देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना या सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षस्थानी एक वादग्रस्त विधान केल आहे. ‘बहुतांश मुली या आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेक-अप नंतर पुरुषावर बलात्कार केल्याचा आरोप करतात’ असं विधान महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केल आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
किरणमयी नायक या छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. जर एखादी विवाहीत व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर अशावेळी मुलींनी हे बघायला हवं की ती व्यक्ती त्यांना जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही. मात्र जेव्हा त्यांच्या सेहे संबंध तुटतात तेव्हा बहुतांश घटनांमध्ये महिला पोलीस ठाण्यात धाव घेतात. असं किरणमयी नायक यांनी म्हटलं आहे. छत्तीसगड मधील बिलासपुर मध्ये महिलांवरील अत्याचाराबाबत माध्यमांशी संवाद साधत असताना असे म्हटले आहे. “ज्या काही घटना समोर येत आहे, त्यामध्ये लिव्ह इनमध्ये राहिल्यामुळे असे प्रकार समोर आले आहे. लिव्ह इनमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवले जातात आणि त्यानंतर मुलगी ही बलात्काराची तक्रार करते. त्यामुळे मुलींनी पाहिले नातं समजून घेतले पाहिजे. तुम्ही जर अशा नातेसंबधांमध्ये असाल तर त्याचे परिणाम हे वाईटच होणार आहे” असा सल्लाही किरणमयी नायक यांनी मुलींना दिला. नायक यांच्या या विधानामुळे छत्तीसगढमध्ये खळबळ उडाली आहे.