चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यात अविरतपणे सामाजिक बांधिलकी जपणारे, आपल्या सामाजिक तथा शैक्षणिक कार्याचा नि:स्वार्थ भावनेने ठसा उमटविणारे ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनतर्फे महिला दिनाचे औचित्य साधुन परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
महिलांना निर्णय प्रक्रियेत भाग घेण्यास प्रोत्साहित करणे, पारंपारिक आणि अपारंपारिक क्षेत्रात महिलांचा कौशल्य विकास घडवून आणण्यास प्रेरित करणे या उद्देश्याने फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी चाळीसगाव परिसरातील आपल्या कार्यकौशल्याने ठसा उटविणार्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्यांची दखल सदर पुरस्काराकरीता घेऊन जागतिक महिला दिनी गौरव केला. सदर नारीशक्ती पुरस्काराने उमंग महिला परिवाराच्या संस्थापिका संपदा उन्मेश पाटील, शिवनेरी फाऊंडेशनचे संस्थापिका प्रतिभा मंगेश चव्हाण, संगम हाॅस्पिटलचे संचालिका डाॅ. शुभांगी पुर्णपात्रे, स्वयंदीप सेवा प्रकल्प यांचे अध्यक्षिका तथा समाजसेविका मिनाक्षी निकम, देवगिरी प्रांत संस्कार भारतीचे नाट्य विद्या प्रमुख सुनिता घाटे, पाटील हाॅस्पिटलचे संचालिका तन्वी पाटील, जिजाऊ महिला मंडळाची संस्थापिका मनिषा पाटील, पंचायत समिती येथील कनिष्ठ सहाय्यक सुनंदा चव्हाण, ग्रामिण पोलिस स्टेशन येथील महिला पोलिस मिताली बच्छाव व अनिता सुरवाडे, चाळीसगाव वकील संघाचे सचिव अॅड. कविता जाधव, टाकळी प्र.चा.चे सरपंच कविता महाजन, ओढरे येथील नवनियुक्त महिला सरपंच पुष्पा पवार, गायत्री साडी सेंटरचे संचालक निर्मला चौधरी, तसेच शहरात महिलांना कार्यप्रेरक ठरणारी महिला रिक्षा चालक तनुजा योगेश उगले व उत्तम गृहीणी उषा दहीहंडे व गृहिणी राधा जाधव व चाळीसगाव तालुक्यात पहिल्या महिला स्टॅम्प वेंडर सविता देशमुख या महिलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
महिलांच्या हक्काचे रक्षण आणि स्री पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाचे विशेष महत्व आहेत. या विशेष दिनी समाजसेवक अशोक राठोड यांनी सदर फाऊंडेशन मार्फंत नारीशक्तीचा सन्मान घडविण्याचा या सत्कृत्याचा सर्वत्र कौतुक होत आहे.