TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शूरवीराच्या शौर्याचा गौरव: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

जिल्ह्यात २८ शहीद स्मारकं उभारणार ! - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा

vijay waghmare by vijay waghmare
May 11, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील धनराज पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळगावी घोडगाव (ता. चोपडा) येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे हे होते. या वेळी जिल्ह्यातील २८ शहीद जवानांच्या स्मारकांसाठीशासनाची मान्यता घेवून लवकरच DPDC निधी मंजूर करून भव्य स्मारकं उभारण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली.

या भावनिक प्रसंगी हजारो ग्रामस्थ उपस्थित राहिले. ‘जय हिंद’ च्या गजरात झालेल्या या कार्यक्रमात शूर जवानाला अभिमानाने मानवंदना देण्यात आली.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

पालकमंत्र्यांचे गौरवोद्गार !
“सुनील पाटील फक्त शेतकऱ्याचा मुलगा नव्हता, तर तो मातृभूमीचा सच्चा शूरवीर होता. त्याच्या शौर्याचे हे स्मारक पुढच्या पिढ्यांना देशभक्तीचा प्रेरणादायी संदेश देत राहील,” असे उद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले.

गौरव सलामीचा अभिमान:
या वेळी शहीद जवानाच्या पुतळ्याला ‘ गौरव सलामी ‘ देण्यात आली. ही एक सशस्त्र व शिस्तबद्ध सन्मान परंपरा असून, ती विशिष्ट शूरवीर, मान्यवर किंवा शहीद यांच्यासाठी दिली जाते. 44 वी वाहिनी भारत-तिब्बत सीमा पोलिस बल, बेलगाव (कर्नाटक) येथून आलेल्या पथकाने ही सलामी दिली. या पथकात सहभागी अधिकारी व जवान निरीक्षक (जी.डी.) सत्यपाल, सहायक उप निरीक्षक (शिक्षण व तणाव परामर्शदाता) संजय कुमार, हैड कॉन्स्टेबल देसले रामकृष्ण, गुगरे दीपक,सिपाही पाटील रविराज, सुर्वे प्रवीण, चंदन शिव कैलाश, लौहार आदित्य, नलवाडे श्रीधर, कलांबे रोहित आणि भोसले पंकज यांचा सामावेश होता.

शहिदाच्या कुटुंबासाठी मदतीचा हात
या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या वतीने शहीद जवानाच्या लहान मुलीच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांची मदत माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते ही रक्कम सुपूर्त करण्यात आली.

‘जय हिंद’च्या गजरात नमन
सिंदूर ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या जवानांना सन्मानपूर्वक सलाम करण्यात आला. आमदार चंद्रकांत सोनवणे म्हणाले, “सुनील पाटील यांनी ‘माझा देश हाच माझा प्राण’ ही भावना मनाशी ठेवून सेवा बजावली. त्यांच्या बलिदानामागे त्यांचे कुटुंब हे खरे नायक आहे.”

पार्श्वभूमी – वीर जवान सुनील पाटील यांचे शौर्य
सुनील पाटील यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९८८ रोजी घोडगाव येथे झाला. प्राथमिक शिक्षण सौंदाणे येथे झाले. माध्यमिक शिक्षण वडजाई व घोडगाव येथे पूर्ण करून त्यांनी SSVPS, धुळे येथून बी.ए. पदवी घेतली. २००९ मध्ये ITBP मध्ये भरती झाल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. २०२१ पासून मणिपूरमधील मोइरंग येथे तैनात होते. ५ ऑगस्ट २०२४ रोजी तेथे कर्तव्य बजावत असताना त्यांनी वीरमरण प्राप्त केले.

उपस्थित मान्यवर व कुटुंबीय
या प्रसंगी माजी आमदार लताताई सोनवणे, शहीद जवान सुनील पाटील यांचे कुटुंबीय – आई मल्लिकाबाई, पत्नी पुनम, मुलगी समृद्धी, आजोबा प्रभाकर, व चुलत भाऊ कैलास पाटील तसेच प्रमुख प्रमुख उपस्थिती माजी आमदार लताताई सोनवणे, जवान निरीक्षक संजय कुमार, सत्यम मलिक, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उद्योगपती प्रकाश बाविस्कर, मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील विजय पाटील, गोपाल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, विकी सनेर, एम. व्ही. पाटील, ऍड शिवराज पाटील, किरण देवराज, सुनील पाटील कांतीलाल पाटील, पिंटू पावरा, अंबादास सिसोदिया, योगराज बडगुजर, यांच्यासह ग्रामस्थ नागरिक विद्यार्थी, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम नव्हे, तर श्रद्धांजलीचा दीप
शहीद जवानाच्या त्यागाची, कुटुंबाच्या धैर्याची आणि देशप्रेमाच्या ऊरकाची साक्ष देणारा हा कार्यक्रम प्रत्येक उपस्थिताच्या अंत:करणावर अमिट छाप उमटवणारा ठरला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaongulabrao patil

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

जळगावात लेखाश्री सोनार यांच्या चित्रकलेचा रंगोत्सव : कला आणि जीवनाचा सुंदर संगम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवेंद्र फडणवीस हे लढवय्ये नेते, मी स्वत: त्यांची भेट घेईन : संजय राऊत

June 28, 2021

पीडितेनं कपडे घातले असले तरीही शारीरिक संबंधांचा प्रयत्न बलात्कारच ठरतो ; हायकोर्टाचा निर्णय !

March 17, 2022

महिलांच्या बचत गटांना कर्जमाफी दया ; नांदेड येथील महिलांचे तहसीलदारांना निवेदन

September 21, 2020

नशिराबादचा आदर्श जिल्ह्यानेच नव्हे तर राज्याने घ्यावा : गुलाबराव पाटील

January 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group