भुसावळ (प्रतिनिधी) येथील सराफ बाजारातील महालक्ष्मी ज्वेलर्सजवळ दोन महिलांनी मिळून एका गृहिणीच्या पर्समधून सोन्याचे दागिने लांबविल्यामुळे खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अधिक असे की, सलमा शेख कलीम (वय ४७ रा. काझी प्लॉट भुसावळ) दि. १० जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सराफ बाजारातील महालक्ष्मी ज्वेलर्सजवळ कामानिमित्त आले होत्या. यावेळी दोन अज्ञात महिलांनी अचानक सलमा शेख यांच्या पर्समधील १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण ५१ हजाराचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना यासिन सत्तार पिंजारी हे करीत आहेत.