मुंबई (वृत्तसंस्था) सोन्याच्या किमतीमध्ये मागील काही दिवसात चढ-उतार सुरु आहे. आज २६ फेब्रुवारीला १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,८४० रुपये आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,८४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दरही कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,१०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,८९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,१९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,९७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,२४० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६४० रुपये आहे.