धरणगाव (प्रतिनिधी) सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत २०१३ – १४ बॅच च्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी केले. या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका पी.आर. सोनवणे होत्या. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधू -भगिनी व कर्मचारी वृंद यांना महापुरुषांचे ग्रंथ व लेखणी भेट स्वरूपात देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित शिक्षक वृंद यांच्या शुभहस्ते शिक्षण क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. २०१३ – १४ बॅच च्या विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधू -भगिनी व कर्मचारी वृंद यांना महापुरुषांचे ग्रंथ व लेखणी भेट स्वरूपात देण्यात आली. यानंतर शाळेला कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची प्रतिमा भेट देण्यात आली. व शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी पाच वृक्ष व पाच जाळ्या भेट देण्यात आल्या. यामध्ये चिंच, वड, निम, पेरू, अशा विविध झाडांचा समावेश आहे. याप्रसंगी पंकज पवार, समाधान महाजन, दुर्गा भोई, ममता भोई , प्रदीप पाटील, गणेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या व शिक्षकांचे आठवणींना उजाळा दिला. गुरुजनांच्या मार्गदर्शनाने आम्ही मार्गक्रमण करत आहोत असे प्रतिपादन विद्यार्थ्यांनी केले. इयत्ता दहावी चे वर्गशिक्षक पी.डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अतिशय सुंदर कार्यक्रम विद्यार्थ्यांनी घडवून आणला योगायोगाने शाळेला ५० वर्षे पूर्ण झाले याचे औचित्य साधून मुलांनी छान आयोजन केलं. यानंतर वर्गशिक्षक एस.व्ही.आढावे व हेमंत माळी यांनी मुलांच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला व पुढील वाटचालीस खूप – खूप शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे यांनी सर्व मुलांना खूप मोठे व्हा !… प्रगती करा !.. असा आशीर्वाद दिला. शाळेची दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले आहेत असे प्रतिपादन केले. शेवटी २०१३ – १४ चे माजी विद्यार्थी कै. मोहन पाटील व कै. किरण महाजन यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता भोई, प्रदीप पाटील तर आभार दुर्गा भोई ने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी २०१३ -१४ च्या संपूर्ण बॅचने परिश्रम घेतले.