धरणगाव (प्रतिनिधी) सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल, येथे ” नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे ” यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. एन. कोळी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे.एस.पवार अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी शाळेचे उपशिक्षक हेमंत माळी यांनी ‘ तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा ‘ या घोषवाक्याचे जनक – आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यानंतर व्ही. टी. माळी यांनी शिवसेना पक्ष प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनसंघर्ष उलगडला. याप्रसंगी शाळेतील उपशिक्षक व्ही. टी. माळी यांच्याकडून शाळेतील वर्ग ९ वी व १० वी तील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे. एस. पवार यांनी महापुरुषांच्या विचारांवर चालण्याचा मोलाचा संदेश दिला.
याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे. एस. पवार, जेष्ठ शिक्षीका एम. के. कापडणे, एम.बी.मोरे, एस. व्ही. आढावे, एस. एन. कोळी, पी. डी. पाटील, हेमंत माळी, व्ही. टी. माळी, सी. एम. भोळे, व्ही. पी. वऱ्हाडे, एम. जे. महाजन, लिपीक जे. एस. महाजन, पी. डी. बडगुजर , ग्रंथपाल गोपाल महाजन, जीवन भोई, अशोक पाटील, प्रदिप पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. एन. कोळी तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख एम. बी. मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक बंधु – भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.