धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलच्या १४ वर्षाआतील विद्यार्थांनी कबड्डी स्पर्धेत तालुकास्तरावर विजय मिळवत जिल्हास्तरावर मजल मारली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल जिपीएस कॅम्पस पाळधी येथे झालेल्या तालुकास्तरिय कबड्डी स्पर्धेत गुड शेपर्ड स्कुलच्या अंडर १४ च्या संघाने अंतिम सामन्यात सर्वज्ञ हायस्कूल बोरखेडा या संघाला मोठ्या फरकाने हरवत विजय मिळवला. या सर्व खेळाडूंचा आज शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी क्रीडा शिक्षक अमोल सोनार यांचा शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते तसेच संघ प्रशिक्षक दिपक बयस (माजी विद्यार्थी) याचा प्राचार्या चैताली रावतोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अंडर १४ संघाचा कर्णधार मेहुल कोठारी, उपकर्णधार मनिष पाटील, खेळाडू भावेश पाटील, आयुष जनकवार, उमन पटेल, विवेक पाटील, अनिकेत माळी दक्ष महाजन, जुएब शेख, क्रिष्णा पवार, सोहम बाविस्कर, दर्शन महाजन या सर्वांचा देखील सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी दर्शना सरला अरुण पवार लिखित न्याय स्वराज्याच्या संकल्पिका राजमाता जिजाऊ हा ग्रंथ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी क्रीडा शिक्षक अमोल सोनार यांनी विजयी खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले तसेच त्यांच्या विजयाचे श्रेय खऱ्या अर्थाने दिपक बयस ला द्यावे लागेल असे मत सोनार सरांनी व्यक्त केले. लक्ष्मण पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासात क्रीडेचे महत्व सांगण्याचा प्रयत्न केला. खेळ माणसाला जगण्याची प्रेरणा देतात, मुलींनी देखील मागे न राहता पुढील वर्षी तालुकास्तरिय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवला पाहिजे असे मत पाटील सरांनी व्यक्त केले. सर्व गुड शेपर्ड परिवाराने यशवंत खेळाडूंचे अभिनंदन केले व त्यांना जिल्हास्तरीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा हे शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी – विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नाजनिन शेख यांनी केले.