नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज गुगलच्या सेवेला फटका बसला आहे. जगभरातील गुगलची सेवा बाधित झाल्याचे दिसले आहे. सायंकाळी ५.२६ वाजता गुगलची जीमेल सेवा आणि हँगआउट सह अनेक सेवामध्ये एरर पेज पाहायला मिळाले. यूट्यूबवर सुद्धा ही समस्या उद्भवली आहे. तसेच गुगल सर्च इंजिन म्हणजेच google.com मात्र व्यवस्थित सुरू असल्याचे दिसत आहे.
प्रसिद्ध व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब आणि जीमेल अचानक डाउन झालं आहे. संपूर्ण जगभरातील युजर्स यूट्यूब आणि जीमेलचा वापर करू शकत नाहीत. जीमेल डाउन झाल्याची तक्रार होताच, जीमेलने ट्विटरवर काही युजर्सला जीमेल अकाउंटमध्ये नेमकं काय झालं आहे, याबाबत माहिती देण्याचं सांगितलं आहे. तसंच त्यांनी याबाबत मदत करत असल्याचंही म्हटलं आहे. जगभरातील गूगलच्या सर्व सर्व्हिसेस सोमवारी संध्याकाळी ५.२६ वाजता क्रॅश झाली. यूजरला जी-मेल, यूट्यूबसह गूगलच्या कोणत्याच सर्व्हिसचा वापर करता येत नाहीये. गूगलने अद्याप यावर कोणतेच स्पष्टीकरण दिले नाही. ब्रिटेनमधील मिरर या वृत्तपत्राने सांगितले की, जगभरातील ५४% लोकांना यूट्यूब अॅक्सेस करता येत नाहीये. तसेच, ४२% लोकांना व्हिडिओ पाहता येत नाहीये आणि 3% लोकांना लॉगइन करताना अडचण येत आहे. याशिवाय जीमेलवरही ७५% लोक लॉगइन करु शकत नाहीयेत.
गूगलचे हँगआउट, गूगल फॉर्म, गूगल क्लाउड, गूगल ड्राइव, गूगल डॉक्सदेखील क्रॅश झाले आहे. गुगलच्या या सेवेला कशामुळे फटका बसला याचे कारण, अद्याप समोर आले नाही. परंतु, युजर्संना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे.