जळगाव (प्रतिनिधी) वीज कोसळून मयत झालेल्या तालुक्यातील एका महिलेच्या वारसांना तसेच जखमी झालेल्या दोघांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मंजूर सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले.
जळगाव तालुक्यातील विटनेर येथे दिनांक २७/०९/२०२१ रोजी वीज पडून सोनिया राजेंद्र बारेला (भिल) या मयत झाल्या होत्या. तर म्हसावद येथे २८/०६/२०२१ रोजी वीज पडून राहुल माधवराव पाटील व कुणाल माधवराव पाटील हे जखमी झाले होते.
या अनुषंगाने राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मंजूर सानुग्रह अनुदानाचे वाटप पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. यात सोनिया राजेंद्र बारेला (भील) यांच्या वारसांना शासकीय नियमानुसार ४ लक्ष रूपये तर जखमी झालेल्या राहुल माधवराव पाटील व कुणाल माधवराव पाटील यांना प्रत्येकी चार हजार तीनशे रूपयांच्या अनुदानाचे वाटप ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी सुधाळकर, तहसीलदार नामदेव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.