TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन ग्रामपंचायती निवडणुका पार पाडाव्यात : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणुचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे मत काही देशांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करुनच विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पाडाव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात पाचही जिल्ह्यांची ग्रामपंचायत निवडणूकी संदर्भात ‘झुम ॲप’ द्वारे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, धुळेचे जिल्हाधिकारी संजय यादव, जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड व प्रत्येक जिल्ह्यातील प्रांत अधिकारी व तहसिलदार झुमद्वारे बैठकीस उपस्थित होते. विभागीय आयुक्त कार्यालयातून उपायुक्त अर्जुन चिखले (महसूल), उपायुक्त (सामान्य) अरुण आनंदकर उपस्थित होते. विभागीय आयुक्त गमे म्हणाले, निवडणूक आयोगाने ग्रामपंचायती निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर केला आहे. यामध्ये नाशिक विभागात एकूण २ हजार ४७६ ग्रामंपचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात ६२१, अहमदनगर ७६७, जळगाव ७८३, धुळे २१८ तर नंदुरबार जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे निवडणूक काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व शासकीय नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व उपाययोजना करण्यात याव्यात अशी सूचना त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात यावी. यासाठी प्रत्येक निवडणूक निरीक्षकांनी हेल्प डेस्कची निर्मिती करुन त्याठिकाणी ऑनलाइन पध्दतीने उमेदवाराचे नामनिर्देशन व घोषणापत्र भरुन घ्यावे. तसेच याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात यावे. प्रत्येक निवडणूक निरीक्षकांनी इव्हीएम मशिन निवडणुकीपुर्वी व मतमोजणी नंतर जिथे ठेवण्यात येतील त्या ठिकाणाची पाहणी करावी. निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे देण्यात आलेल्या भागामध्ये सहा वेळा पाहणी करून परिपूर्ण अहवाल निवडणूक आयोगाला पाठविणे आवश्यक असल्याचे, विभागीय आयुक्त गमे यांनी सांगितले.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

निवडणूक निरीक्षकांनी मतदान प्रक्रियेत नेमलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्यप्रकारे प्रशिक्षण द्यावे. तसेच प्रशिक्षणात अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरहजर असतील किंवा कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. आचारसंहितेचे उल्लंघन होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात याव्यात, असे निर्देश गमे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. निवडणूक निरीक्षकांनी आयोगाने ठरवून दिलेल्या नियमावलीतच काम करणे आवश्यक असून, कुठेही नियमांचे उल्लंघन होवू नये. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक पध्दतीने पार पडावी यासासाठी प्रत्येक निवडणूक निरीक्षकांनी पूर्वतयारी करावी, अशा सूचना गमे यांनी यावेळी दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

भूजल पातळी वाढविण्याची गरज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी !

June 28, 2023

भूमि अभिलेख कार्यालयातील दोन महिला कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटकेत !

August 24, 2023

धक्कादायक ! मनपा आयुक्तांकडून शासकीय निधीचा अपहार ; साहाय्य्क अभियंत्यांचा आरोप

February 15, 2022

जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे “पर्यावरण” सप्ताह साजरा

June 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group