जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ढालगाव शिवारात नीलगाईच्या कळपामुळे घडलेल्या अपघातात बैलगाडीला जुंपलेले दोन्ही बैल विहिरीत पडून मृत्यू पावले. या घटनेत शेतकऱ्याचे जवळपास १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अरुण आत्माराम पर्वते हे सायंकाळी चारा आणण्यासाठी बैलगाडी घेऊन शेतात गेले होते. गाडी उभी ठेवून ते गाठोडे टाकत असताना, अचानक नीलगाईंचा कळप तेथे आला. या कळपाच्या भीतीमुळे दोन्ही बैल गाडी घेऊन सैरावैरा पळत सुटले. गाडी शेताच्या बांधावर असलेल्या विहिरीत जाऊन पडली. हे पाहून अरुण पर्वते यांनी शेतमजुरांना बोलावले, पण त्यापूर्वीच बैल विहिरीत पडले होते. काही वेळाने जेसीबीच्या सहाय्याने बैलांना बाहेर काढण्यात आले, परंतु दुर्दैवी अपघातात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. यामुळे अरुण पर्वते यांना सुमारे १ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर ही दुर्दैवी घटना नैसर्गिक संकट आणि आर्थिक संकट दोन्ही रूपाने ओढवली आहे.
या घटनेनंतर वन विभागाने त्वरित नीलगाईंच्या कळपाचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. संजय पाटील यांनी अधिक स्पष्ट करत सांगितले की, “जगभरात दिव्यांगांची लोकसंख्या सात ते आठ टक्के आहे आणि महाराष्ट्रात ७० लाखांहून अधिक दिव्यांग लोक आहेत. यासाठी, शासन आणि प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या समस्यांचे त्वरित समाधान करावे. यावेळी, मॅगझिन व इतर दिव्यांगांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि सर्वांनी एकजूट होऊन दिव्यांगांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची आवश्यकता व्यक्त केली.