TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामसमृद्धी योजना गैरव्यवहार : पंचायतराज समितीच्या अजेंड्यावर घेणार ; आ. किशोरआप्पा पाटलांचे आश्वासन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात राबवण्यात येत असलेल्या शरद पवार ग्रामसमृद्धी गाई व म्हैस गोठा अनुदान योजनेत मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येईल. हे प्रकरण पंचायतराज समितीच्या जिल्हा दौऱ्याच्या कामकाजात समाविष्ठ करून अजेंड्यावर घेतले जाईल, असे आश्वासन समितीचे सदस्य आ.किशोरआप्पा पाटील यांनी दिले.

मुक्ताईनगर तालुक्यात ग्रामसमृद्धी गाई व म्हैस गोठ्याच्या वैयक्तिक अनुदानाच्या योजनेत कृती आराखड्यात नसतांना सुद्धा तब्बल ८८३ कामांना प्रशासकीय मान्यता घेण्यात आली असून ११२ कामांचे बिल अदा होऊन प्रचंड गैरव्यवहार, अनियमितता व राजकीय प्रभावाने शासनाची उघड फसवणूक केली जात असल्याची तक्रार जनसंग्राम बहुजन लोकमंच सामाजिक संघटनेच्या वतीने पंचायतराज समितीकडे करण्यात आली.

READ ALSO

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

जनसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रांवरून हा गैरव्यवहार पुढे आला आहे. याची चौकशी व्हावी यासाठी गैरव्यवहार लक्षात आणून देऊन यात सहभागी अधिकारी, कंत्राटी टीम आणि राजकीय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी जनसंग्रामच्या वतीने काळ्या फिती लावून समितीचा दौरा अडवला जाईल, असा इशारा ठाकरे यांनी दिला होता. याची दखल घेत पंचायतराज समितीचे सदस्य व आ.किशोरआप्पा पाटील यांनी मध्यस्थी करत समितीच्यावतीने जनसंग्रामची लेखी तक्रार स्विकारत या प्रकरणाची चौकशी व कारवाईचे आश्वासन दिले.

जनसंग्रामच्या तक्रारीत हे आहेत गैरव्यवहाराचे मुद्दे

>> राज्यात ही योजना राबवताना कंत्राटी समन्वयक कार्यरत असून ग्रामपंचायतीकडून मनरेगा योजनेचे जॉब कार्ड असलेल्या मजुरांना हे काम देणे आवश्यक असतांना ज्या लाभार्थ्यांच्या नावावर योजना मंजूर झाली आहे. त्यांचीच नावे मनरेगाच्या मस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

>> कृती आराखड्यात अंदाजपत्रकात मंजुरी नसतांना २०१८ ते २०२१ या कालावधीत तब्बल ८८३ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन यातील ११२ गोठयांचे अनुदान व बिलाची सुमारे ५२ हजार ६०० याप्रमाणे प्रत्येकी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.

>> गोठ्याची कामे झालेली नसतांना किंबहु आपले जुने पत्री शेड किंवा वापरातील गोठे दाखवून ही रक्कम लाटण्यात आल्याच्या व त्यात गैरव्यवहार झाल्याच्या अनेक तक्रारी आता होत आहेत.

>> तालुक्यात या योजनेचे अंमलबजावणी समन्वयक कंत्राटी शाखा अभियंता यांनी प्रत्येकी ५ हजार घेऊन ८८३ कामांना प्रशासकीय मान्यता दिली त्यांनतर योजना मान्य झालेल्या लाभार्थ्याच्या नावानेच मनेरेगाचे जॉब कार्ड तयार करून घेत अँडव्हान्स वसूल केलेले ५ हजार खात्यावर परतावा केल्याचा खटाटोप करून ४०-४५ लाख हडप केल्याची चर्चा आहे.

>> गोठा योजनेत झालेल्या या गैरव्यवहारात तालुक्यात रॅकेट सक्रिय असून लाभार्थ्याना प्रशासकीय मान्यता मिळवून देण्याच्या नावावर त्यांच्याकडून पैसे घेऊन आता बिल निघायला विलंब होत असल्याने मुक्ताईनगर पंचायत समितीत दररोज अक्षरशः जत्रा भरत आहे, असे मुद्दे नमूद केले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
Next Post

धरणगाव येथे भाजपातर्फे कोरोना लसीकरण शिबीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेशनचे दुकान बदलायचं आहे ? ; मग ‘मेरा रेशन’ अँप करा डाऊनलोड ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती

January 4, 2022

दुर्दैवी घटना : बीड जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतकरी महिला ठार !

April 20, 2023

धारदार शस्त्राने पतीने चिरला पत्नीचा गळा,नंतर पोलिसांत आत्मसमर्पण ; धक्कादायक कारण आले समोर !

November 1, 2023

युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे नेहरू युवा केंद्राचे आवाहन

November 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group