धरणगाव (प्रतिनिधी) स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चा उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाअंतर्गत धरणगाव नगरपरिषदेतर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यात सहभागी स्पर्धकांच्या चित्रांचे/पोस्टर्स चे नगरपरिषद कार्यालयामध्ये दि. २७ जानेवारी २०२१ रोजी भव्य प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच पर्यावरणाची होणारी हानी थांबवून पृथ्वी, जल, वायु, अग्नि, आकाश या पंचतत्वांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी “माझी वसुंधरा” या अभियानाची सुरुवात केलेली आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चा उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच या अभियानाअंतर्गत धरणगाव नगरपरिषदेतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून सहभागी स्पर्धकांच्या चित्रांचे/पोस्टर्स चे नगरपरिषद कार्यालयामध्ये दि. २७ जानेवारी २०२१ रोजी भव्य प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे तसेच विविध सामजिक माध्यमामध्ये सर्व स्पर्धकांचे चित्र/पोस्टर्स प्रसिद्ध करण्यात येईल. या स्पर्धा शालेय विद्यार्थी व इतरांसाठी खुला गट अशा दोन गटात राबविण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदणी शाळेत करावी व इतर स्पर्धकांनी आपली नावनोंदणी ९५६१५७५८९४ क्रमांकावर व्हॉट्सअँप द्वारे करावी. तसेच स्पर्धकांनी नाव नोंदणी करण्याची अंतिम दि. २५ जानेवारी २०२१ संध्या.६.०० वाजेपर्यंत आहे. तर चित्र/पोस्टर्स जमा करण्याची अंतिम मुदत २६ जानेवारी २०२१ दु. १२.०० वाजेपर्यंत आहे.
स्पर्धेचे विषय
१. माझी वसुंधरा
२. प्लॅस्टिक बंदी
३. हागणदारीमुक्त शहर
४. स्वच्छ शहर, हरीत शहर
५. स्वच्छ सर्वेक्षण २०२१
६. जल संवर्धन
तसेच स्पर्धेसाठी स्पर्धकांना A-२/A-३ साईजचे कागद नगर परिषदेतर्फे देण्यात येतील. तसेच इतर आवश्यक साहित्य जसे की रंग, ब्रश, रंग पेन्सिल, खडू इ. स्पर्धकांनी स्वतःचे वापरावे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येईल तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. तसेच अधिक माहितीसाठी संपर्क निलेश वाणी : ९६३७४२६३७४, तुषार सोनार : ९५६१५७५८९४ यांच्याशी स्पर्धक संपर्क साधू शकतात.