जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज मनपा इमारतीत साजरी करण्यात आली.
मनपा इमारतीत आयोजित कार्यक्रमात महापौर जयश्री महाजन यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, अपर आयुक्त विद्या गायकवाड आणि कर्मचारीवृंद उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.