नशिराबाद (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव तर्फे माजी राष्ट्रपती तथा मिसाईन मॅन डॉ.कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिपक साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली अथर्व प्रकाशनाच्या कार्यालयात गुरुवार दि.२७ जुलै २०२३ रोजी अभिवादन सभा झाली. यावेळी शाकीर शेख,सुनिल महाजन ( महाराष्ट्र माळी समाज महासंघ,जळगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष ),चेतन अहिरराव,दिपक माळी,उपस्थित होते.
प्रारंभी दिपक साळुंके व शाकिर शेख यांच्या हस्ते डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम लिखित पुस्तके व त्यांच्या जीवनावरील चरित्रात्मक व वैचारीक ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. फित कापण्याच्या सोपस्काराऐवजी ‘ युवा गीत ‘ दिपक साळुंके यांनी सादर केले. शिक्षकांनी करायची ‘दशसूत्री प्रतिज्ञा’ विजय लुल्हे यांनी सादर केली.
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या लेखन कार्य व ग्रंथ प्रेमाची माहिती डॉ. कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक प्रमुख विजय लुल्हे यांनी दिली.डॉ.कलाम याच्या अनोख्या सामाजिक कार्याची माहिती सुनिल महाजन यांनी दिली.समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात दिपक साळुंके यांनी डॉ.एपीजे.अब्दुल कलाम यांच्या वैज्ञानिक अतुलनीय कर्तृत्वासह निष्कलंक राजकीय कार्याची महती सांगितली. कार्यक्रमास लोकेश शिंदे,पंकज जाधव ग्रंथप्रेमी उपस्थित होते.प्रास्ताविक संयोजक विजय लुल्हे व आभार प्रदर्शन सुनिल पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गिरीष चौधावकर,शरद महाजन, सागर महाजन यांनी अमूल्य सहकार्य केले.