TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांनी स्वीकारले अनाथांचे पालकत्व !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पालकत्व स्वीकारण्याची घोषणा केली आहे. या बालकांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभासह ना. गुलाबरावजी पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. तर जनतेचे प्रेम व आशीर्वाद हीच आपली ताकद असली तरी यंदा फक्त मोबाईल क्रमांकावरूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले आहे.

दरम्यान, कोविडच्या आपत्तीमुळे ना. गुलाबराव पाटील यांनी ५ जून रोजी येणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचे घोषीत केले असून या दिवसाला जिल्हाभर फक्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर कार्यकर्त्यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या चाहत्यांनी भर दिला आहे.

READ ALSO

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा ५ जून रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त दरवर्षी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. वाढदिवसाला पाळधी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरच्या मैदानावर सायंकाळी जंगी सभा देखील होत असते. गेल्या वर्षी कोरोनाच्या आपत्तीमुळे ना. पाटील यांनी वाढदिवस साजरा केला नव्हता. तर यंदा देखील वाढदिवस साजरा करण्यात येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आजवर चाहते मोठ्या उत्साहात व चैतन्यदायी वातावरणात वाढदिवस साजरा करत असतात. यानिमित्त होणार्‍या सभेतून लोकांशी संवाद देखील साधता येतो. मात्र कोरोनामुळे कडक निर्बंध लावण्यात आले असून याचे पालन करत गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील आपण वाढदिवस साजरा करणार नाही. वाढदिवस पुढे देखील साजरे करता येतील. मात्र आजची प्राथमिकता ही कोरोनाग्रस्तांची सेवा आणि शासकीय नियमांचे पालन ही आहे. यामुळे आपल्या वाढदिवसाला कोणत्याही अभिष्टचिंतनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार नाही. पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आपण फक्त फोनसह सोशल मीडियातूनच शुभेच्छा स्वीकारणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. फक्त कोरोनाच्या आपत्तीच्या पार्श्‍वभूमिवर जिल्हाभर आवश्यक त्या कार्यक्रमांना कार्यकर्त्यांनी व त्यांच्या प्रेमींनी भर दिला आहे.

दरम्यान, वाढदिवसाचे औचित्य साधून ना. गुलाबरावजी फाऊंडेशनने कोरोनामुळे अनाथ झालेल्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनामुळे अनाथ व निराधार झालेली मुले, विधवा झालेल्या महिला आदींना शासकीय योजनांच्या लाभासह ना. गुलाबरावजी पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून आवश्यक ती मदत केली जाणार आहे.

याच्या अंतर्गत जिल्ह्यात कोविडमुळे आई-वडील दोघांचा मृत्यू झाला अशा १८ वर्षाच्या आतील 9 मुलांची माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे एक पालक गमावलेले १९१ मुले तर, विधवा झालेल्या १५३ महिलांची नावे शासकीय यंत्रणेकडे नोंद झालेली आहेत. यातील बालकांना शासनाच्या नियमानुसार मदत केली जाणार आहे. तर महिलांना संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, नॅशनल फॅमिली पेन्शन स्कीम आदींच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. तर, २० अनाथ बालकांना ना. गुलाबरावजी फाऊंडेशनच्या मदतीने शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे. यात त्यांना शैक्षणिक साहित्यासह शिक्षणाची जबाबदारी उचलण्यात येणार आहे. तसेच विधवा महिलांना शिलाई मशिनसह अन्य मदत करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संसर्गात समाजहित हे सर्वतोपरी मानणे आवश्यक आहे. या अनुषंगाने अनाथांचे पालकत्व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वीकारली असल्याची माहिती फाऊंडेशन च्यावतीने देण्यात आलेली आहे.

दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाला संपूर्ण जिल्हाभरात समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात, जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोविडमुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असल्याने ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाला जिल्ह्यातील कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. हे वाटप फक्त मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून नंतर गरजू कलावंतांच्या घरी ही सामग्री पोहचवली जाणार आहे. कोरोनामुळे ऑक्सीजनची उपलब्धता हा सर्वात महत्वाचा घटक असल्याची बाब लक्षात घेऊन ऑक्सीजन बँक उभारण्यात येत आहे. यासाठी ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाला २० ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर रूग्णसेवेत सादर करण्यात येणार आहेत. तर याच दिवशी पाच व्हेंटीलेटरसह ५ ह्युमिडीफायर; २ बाय पॅप मशिन्स; १० मल्टी पॅरा पेशंट मॉनिटर; ५० पल्स ऑक्सीमीटर आणि १०० डिजीटल थर्मामीटर भाऊसो गुलाबराव पाटील फाउंडेशनला देण्यात येणार आहेत.

पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात, मोहाडी येथील महिला रुग्णालय परिसरात व चांदसर व इतर ठिकाणी पाचशे मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरूपात साहित्य वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय, आयुष्यमान भारत योजनांसह विविध जनाहिताची दाखले वाटपाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

दरम्यान, जनतेचे प्रेम व आशीर्वाद हीच आपली ताकद असली तरी यंदा फक्त मोबाईल क्रमांकावरूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात असे आवाहनदेखील पालकमंत्र्यांनी केले आहे. यासाठी चाहत्यांनी ९३२५८७३३९९; ९७६४०३३६०१; ९९२३३५८८१४ आणि ९१५८०३३३२१ या क्रमांकांवर कॉल, व्हाटसअ‍ॅप मॅसेज अथवा एसएमएस करून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन देखील भाऊसो गुलाबराव पाटील फाउंडेशन च्यावतीने करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

कौतुकास्पद : कोरोनाबाधित सासऱ्याला खांद्यावर उचलून नेलं रुग्णालयात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly-Horoscope साप्ताहिक राशीभविष्य २६ जून ते २ जुलै २०२३ !

June 25, 2023

कोरोना काळात आरोग्य विभागाने चांगले काम केले : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

January 30, 2021

ब्रेकिंग न्यूज : शरद पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्तीची घोषणा !

May 2, 2023

कौटुंबिक कलहातून आधी पत्नीवर झाडली गोळी नंतर स्वत:ला संपवलं !

April 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group