धरणगाव (प्रतिनिधी) येथील धरणगाव तालुक्यातील वराड बु. येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कै आनंदा शामराव पाटील यांच्या कुटूंबियांची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घरी जाऊन भेट घेतली.
पालकमंत्र्यांचा हस्ते आत्महत्याग्रस्त शेतक-याची पत्नी श्रीमती संगीताताई आनंदा पाटील यांना शासनाच्यावतीने एक लाख रुपयांच्या मदतीचे वाटप केले. पालकमंत्र्यांचा हस्ते ३० हजार रुपयांचा धनादेश व 70 हजार रुपयांची पोस्टाची पावती देण्यात आली. याप्रसंगी एरंडोलचे प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार विनयकुमार देवरे, पं. स. सभापती मुंकुंद नन्नवरे , माजी सभापती अनिल पाटील, टिकाराम पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.