TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उभारण्यात आलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

 

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऋषिकेश येथे देशात उभारण्यात आलेल्या 36 हवेतून निर्माण होणाऱ्या पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी देशभरातील पीएसए प्लांट बसविल्या गेलेल्या रुग्णालयांना ऑनलाईन संबोधित केले. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उदघाटन श्रीफळ वाढवून व ऑक्सिजन मशीनची कळ दाबून करण्यात आले. यावेळी आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे यांच्यासह प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, प्र. प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले आदि उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

 

यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा साथरोग काळात तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प रुग्णांच्या उपचारासाठी व त्यांना बरे करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्यात अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारून जिल्हा ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या पीएसए ऑक्सिजन प्लांटची मान्यवरांनी पाहणी केली. या कार्यक्रमासाठी ऑक्सिजन प्लांटचे समन्वयक डॉ. संदीप पटेल, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, डॉ. विलास मालकर यांच्यासह डॉ. इम्रान तेली, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. वैभव सोनार, डॉ. योगिता बावस्कर, डॉ.उमेश जाधव, असिस्टंट मेट्रेन आशा चिखलकर यांच्यासह अधिकारी दिलीप मोराणकर, राजेंद्र धाकड, संजय चौधरी, संजय पाथरूट, महेश गुंडाळे आदि अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

ऑक्सिजन प्रकल्पाची वैशिष्ट्य

 

साथरोग तसेच कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत ऑक्सिजन रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत जीवरक्षक वायू ठरत आहे. जगभरात रुग्णांची संख्या वाढून त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज वाढली. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची जागेवरच निर्मिती व्हावी यासाठी पी एस ए ऑक्सिजन जनरेशन प्लांट ही संकल्पना निर्माण झाली. या प्लांटद्वारे हवेतुनच ऑक्सिजनची जागेवर निर्मिती केली जाते. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजनवर अवलंबून रहावे लागत नाही. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्लांट हा एक हजार लिटर प्रति मिनिट एवढा ऑक्सिजन निर्माण करू शकतो. याठिकाणी दिवसाला साधारण १.८७ मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन निर्माण होईल. जो रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाचा ठरेल. हा प्लांट पीएम केअर अंतर्गत डीआरडीओ व राज्य शासनाच्या मदतीने उभारण्यात आला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

पाटणादेवीच्या जंगलात हातपाय बांधून एकाचा धारदार शस्त्राने खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोटरी क्लब जळगाव ईलाईट पदग्रहण सोहळा उत्साहात

July 16, 2021

जिल्हा बँक निवडणूक : पहिल्याच दिवशी १२७ अर्जाची विक्री ; आ. चिमणराव पाटलांनीही केला अर्ज दाखल !

October 12, 2021

रत्नागिरीमध्ये आज मिमिक्री आर्टिस्टची सभा ; सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर डागली तोफ !

May 6, 2023

जून्या वादातून चौघांनी तरुणाच्या डोक्यात टाकला रॉड ; गुन्हा दाखल !

February 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group