पाळधी (प्रतिनिधी) येथे उदय ई व्ही टेक बॅटरीवर चालणाऱ्या मोटर बाइक चे उद्घाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. पाळधी येथील उदय झवर यांनी सुरू केलेल्या बॅटरीवर चालणाऱ्या बाइकच्या शोरूम नुकतेस सुरू केले असून कमीत कमी खर्चात एक किलोमीटरला फक्त २० पैसे एवढा खर्च, शिवाय “०”मेंटेनेस येतो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प चे माजी सदस्य विनोद शेठ तराड, फर्टिलायझर संघटना अध्यक्ष होते. तसेच उद्घाटन ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती दिलीप बापू पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, प स सभापती मुकुंद भाऊ नन्नवरे, जि प सदस्य प्रताप पाटील, दिलीप शेठ, सरपंच प्रकाश पाटील, माजी जि प सदस्य रवींद्र पाटील, अनिल सेठ कासट, नीलकंठ पाटील, दामू अण्णा पाटील आदी उपस्थित होते. आभार व सत्कार उदय झवर यांनी केले.
















