धरणगाव (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयात आज कोविंड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपयाचा धनादेश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ना. पाटील यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला देखील भेट दिली. यावेळी ना. पाटील यांनी रुग्णांकडून आरोग्य विषयी माहिती जाणून घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्यात.
धरणगाव येथे आज तहसील कार्यालयात कोविंड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत धरणगाव तालुक्यातील रुग्ण संख्या किती व त्यांचे प्रमाण किती कमी झाले असून प्रत्येक वेळेस सेंटरला काही अडचणी येत आहे, त्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी जे काही लागत असेल ते पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील मदत करायला बांधील आहे. लसीकरणाच्या संदर्भात येत असलेल्या अडीअडचणी देखील मार्गी लावण्यात आल्या आहे.
१ मे पासून १८ वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना लसीकरण करायचे असून ते नियोजन देखील आढावा बैठकीत करण्यात आले. धरणगाव कार्यालयात कुटुंब लाभ योजनेचा पात्र झालेले लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये चेक देऊन वाटप करण्यात आले. या योजनेत धरणगाव तालुक्यातील एकूण पंधरा महिला असून त्यांना प्रत्येकी वीस हजार रुपयाचा चेक पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. आज सकाळी धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट दिली असून त्यांनी रुग्णांकडून आरोग्य विषयी माहिती जाणून घेतली.
यावेळी रुग्णालय संदर्भात अडीअडचणी तात्काळ मार्गी लावण्यात आल्या. लसीकरणच्या संदर्भात जळगाव जिल्ह्यात पंचवीस हजार लस प्राप्त झालेले असून उद्या अजून मोठ्या प्रमाणावर लस प्राप्त होणार आहेत. लसीकरण संदर्भात कुठल्याही अडचणी येणार नाहीत. यावेळी उपस्थित पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, तहसीलदार नितींकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, नगरपालिकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जनार्दन पवार, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष गुलाबराव वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे, डॉ. सुनील बन्सी, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सुनील पवार, नगरसेवक विलास महाजन, रवींद्र कंखरे, पी एम पाटील, राहुल रोकडे आदी शासकीय अधिकारी कर्मचारी या कुटुंब योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.