धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. ना.पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेत आरोग्य सुविधा अधिक चांगल्या करण्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी आज धरणगाव ग्रामीण रुग्णालयला भेट देत रुग्णालयाची पाहणी केली. ना. पाटील यांनी यावेळी डॉक्टरांसोबत चर्चा केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, पी.एम. पाटील, राजेंद्र महाजन, पप्पू भावे, वासुदेव चौधरी, विलास महाजन, अजय चव्हाण, शरद पाटील, धीरेंद्र आप्पा पुरभे, मोहन महाजन, योगेश वाघ,राहुल रोकडे, गोपाल चौधरी, दगडू चौधरी, बाळू जाधव,विकास लांबोळे, अविनाश चौधरी, रामचंद्र महाजन, योगेश पाटील व सर्व शिवसेना नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.