चोपडा प्रतिनिधी – येथील भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संयुक्त विद्यमाने वाचन कौशल्यावर आधारित मार्गदर्शक कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस. डी. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व, त्याचा विद्यार्थी जीवनातील उपयोग यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात प्रा. डॉ. मोहिनी उपासनी यांनी पुस्तक परीक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.संबोधी देशपांडे यांनी व प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन ग्रंथपाल प्रा. कल्पना सोनवणे यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौदाणकर, उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी, प्रा .डॉ.विनोद रायपुरे तसेच सर्व ग्रंथालय सहकारी व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थी उपस्थित होते.