TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आयपीएल जेतेपदासाठी आज महासंग्राम

बंगळुरू-गुजरातमध्ये अंतिम लढत

vijay waghmare by vijay waghmare
May 31, 2026
in क्रीडा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदाबाद (प्रतिनिधी) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स रविवारी होणाऱ्या आयपीलएच्या अंतिम फेरीतून दुसऱ्या विजेतपदासाठी लढताना दिसतील. बंगळुरूने गतवर्षी पहिल्यांदाच किताब पटकावला होता आणि आता सलग दुसऱ्यांदा जेतेपद राखण्यासाठी उत्सुक असतील, तर गुजरात २०२२ नंतर पुन्हा इतिहास लिहण्यासाठी सज्ज आहे. तारांकित फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांच्यातील द्वंद या लढतीचे आकर्षण असेल.

कागदावर गतविजेता एक प्रबळ दावेदार मानला जातो.कारण त्यांचा निर्भय आणि धोका पत्करणारा खेळ संपूर्ण स्पर्धेत प्रभावी ठरला आहे. या आक्रमक रणनीतीमुळे संघ कधीकधी अडचणीत आला आहे, परंतु विराट कोहली (६०० धावा), देवदत्त पडिक्कल (४६३), टीम डेव्हिड (२८१), (४८६) उपलब्ध असताना फिल सॉल्ट, व्यंकटेश अय्यर यांनी सातत्याने आक्रमक फलंदाजी केली आहे. यंदाच्या हंगामात इतर कोणत्याही संघापेक्षा सर्वाधिक वेळा २०० धावांचा पल्ला ओलांडण्याचा विक्रम बंगळुरूच्या नावावर जमा झाला आहे. कर्णधार रजत पाटीदारच्या शांत आणि संयमी नेतृत्वशैलीमुळे गेल्या दोन हंगामांपासून संघाला स्थिरता प्राप्त झाली आहे. भुवनेश्वर कुमारच्या (२६ बळी) नेतृत्वाखालील गोलंदाजी आक्रमणाला लयमध्ये असलेल्या गुजरातच्या आघाडी फळीविरोधात सर्वोच्च कामगिरी करावी लागेल. जोश हेझलवूड (१३ बळी), रसिक सलाम (१६ बळी) आणि अष्टपैलू कृणाल पंड्या (१३ बळी) यांनी मिळून एक बलाढ्य गोलंदाजी आक्रमण तयार केले आहे.

READ ALSO

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

कर्णधार शुभमन गिल (७२२ धावा), साई सुदर्शनने (७१०) आणि जोस बटलरने (५०७ धावा) या आघाडीच्या फळीवर गुजरातची मदार आहे. यंदाच्या हंगामातील गुजरातचा घरच्या मैदानावरचा विक्रम (सातपैकी पाच विजय) निश्चितच संघाला काहीसा आत्मविश्वास देणारा आहे. तथापि, हे आव्हान सोपे नसेल. कारण बंगळुरूची गोलंदाजी अत्यंत वैविध्यपूर्ण आणि धारदार आहे. गुजरातची मदार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (२८ बळी) आहे. मोहम्मद सिराज (१८), राशीद खान (१९), जेसन होल्डर (१७) आणि प्रसिध कृष्णा (१६) यांच्यासारख्या गोलंदाजांनी मिळून एक जबरदस्त आक्रमण तयार केले आहे. रबाडा आणि सिराज यांनी या हंगामात मिळून अनुक्रमे १६५ आणि १६२ निर्धाव चेंडू टाकले आहेत, यावरून असे दिसून येते की दोन्ही सपाट खेळपट्ट्यांवरही फलंदाजांना नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.

सिराजच्या तंदुरुस्तीवरही लक्ष ठेवले जाईल. कारण, शुक्रवारी मुल्लानपूर येथे राजस्थानच्या क्वालिफायर २ मध्ये त्याला खांद्याचा त्रास जाणवला होता आणि या परिस्थितीतही त्याने आपल्या चार षटकांचा कोटा पूर्ण केला होता. पण तो मैदानावर अस्वस्थ दिसत होता.उभय संघ क्वालिफायर-१ मध्ये एकमेकांशी भिडले होते. त्या वेळी बंगळुरूने फलंदाजांच्या सरस कामगिरीवर बाजी मारली होती. गुजरात या लढतीमधील उणिवा दूर करून आव्हान देण्याच्या तयारीत असेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AhmdabadThe battle for the IPL title today

Related Posts

जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
जळगाव

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

September 2, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
जळगाव

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

August 30, 2026
जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 01 जुन 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

April 7, 2025

भाजपची डोकेदुखी वाढली! सानपांच्या प्रवेशानं अनेक नगरसेवक रामराम ठोकणार?

December 22, 2020

शिवसेनेच्या प्रवक्तेपदी गुलाबराव पाटील

September 9, 2020

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 07 जानेवारी 2026 !

January 7, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group