धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज ज्येष्ठ शिवसैनिक तथा धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती नारायण रामकृष्ण पाटील (पंडित बापू) यांच्या घरी आस्थेवाईकपणे तब्येची विचारपूस केली. यावेळी दोघांमध्ये चांगलाच गप्पांचा फड रंगला.
पंडित बापू यांची मागील काही दिवसापासून तब्येत बरी नव्हती. याची माहिती मिळताच गुलाबभाऊ त्यांच्या घरी पोहचत तब्येची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. पंडित बापू यांनी शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात खूप कष्ट घेत संघटना उभी केली होती. त्यांनी अनेक आंदोलनं गाजवली होती. पंडीत बापू आणि गुलाबभाऊ हे दोघं जण १९९२ मध्ये सोबत धरणगाव पंचायत समितीत सदस्य म्हणून निवडणूक आले होते. सुरुवातील पंडित बापू सभापती झाले.
दोघांनी अनेक वर्ष सोबत काम केले असल्यामुळे त्यांच्यातील मैत्रीचा धागा आजही घट्ट आहे. गुलाबभाऊ बापूंना आजही आपले मोठे बंधू प्रमाणेच सन्मान देतात. त्यामुळे गुलाबभाऊ घरी पोहोचल्यानंतर पंडित बापू यांचाही चेहरा खुलला होता. विधानसभेची पहिल्यांदा उमेदवारी मिळाली तेव्हापासून तर आतापर्यंत देखील पंडितबापू गुलाबभाऊंसोबतच आहे. आजच्या भेटीदरम्यान, दोघांनी आपल्या आठवणीतील अनेक जुने किस्से उपस्थितांना सांगितले.
दोघंही जण जुन्या आठवणीत रमल्यामुळे उपस्थितांनाही भूतकाळातील अनेक राजकीय गोष्टी पहिल्यांदा कळाल्या. तब्येत खराब असतानाही पंडितबापूंनी गुलाबभाऊंना राजकीय घडामोडी काय चालू आहेत?, कुठं काय परिस्थिती आहे, याची माहिती देखील जाणून घेतली. तब्येची आस्थेवाईकपणे विचारपूस केल्यानंतर दोघं मित्रांनी एकमेकाचा निरोप घेतला. यावेळी प. स. माजी सभापती प्रेमराज पाटील, दामू अण्णा पाटील, भाऊसाहेब पाटील, धर्मराज पाटील, अधिकार पाटील, चंदुशेट भाटिया, सुरेश पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.