जळगाव (प्रतिनिधी) जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे कट्टर इस्लामिक दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह आज मुंबई विमानतळावर आणण्यात आले. त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले.
तसेच या निष्पाप नागरिकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत काही कट्टर इस्लामिक दहशतवादी धार्मिकतेचा खोटा आधार घेऊन उन्माद करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु आपले दृढनिश्चयी भारत सरकार या कट्टर इस्लामिक दहशतवाद्यांना त्यांना समजणा-या भाषेतच धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी स्पष्ट केला.