धरणगाव (प्रतिनिधी) येथील भूमिपुत्र गुलाबराव वाघ यांनी १८ वर्षे शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून यशस्वी कारकिर्द सांभाळली, म्हणून शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची बढती करुन शिवसेना जळगाव लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्या बद्दल समस्त पाटील समाज पंच मंडळ (लहान माळी वाडा परिसर) धरणगाव यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यानिमित्ताने समाजाच्यावतीने समाजाचे पंच मंडळ यांचा हस्ते सत्कार गुलाबराव वाघ यांचा करण्यात आला.
याप्रसंगी जेष्ठ संचालक माधवराव पाटील, समाजाचे अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीपबापू पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, सचिव महेश्वर पाटील, संचालक मोहन पाटील, कैलास पाटील, वाल्मिक पाटील, गणेश पाटील, आनंद पाटील (पहेलवान), जितेंद्र पाटील (महाराज) आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पुढील वाटचालीसाठी समस्त पाटील समाज पंच मंडळ (लहान माळी वाडा परिसर) यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. सत्काराला प्रतिउत्तर देत गुलाबराव वाघ यांनी आभार मानतांना सांगितले की, मी समाजाच्या विकास कामांसाठी व अडी – अडचणी सोडवण्यासाठी आपल्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रयत्न करील असे वचन समाजाच्या पंच मंडळास दिले.