मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील बऱ्हाणपूर ते मुक्ताईनगर अवैध गुटखा बाळगल्याप्रकरणी चार जणाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील बऱ्हाणपूर ते मुक्ताईनगर रोडवर दि २३ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास एका बोलेरोमध्ये तब्बल २ लाख रुपयांचा गुटख्याची वाहतूक सुरु होती. याचवेळी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकातील स.फौ.बशीर गुलाब तडवी यांनी ( एम.एच.१९.बी.एम.५४००) या नंबरची बोलेरोची मुख्य रस्त्यावर तपासणी केली. या कारमधून लाखो रुपयाचा प्रतिबंधित पान मसाला आणि गुटखा आढळून आला. या प्रकरणी संशयित आरोपी चेतन सुभाष झाबरे, विनायक मनोहर चान्देलकर, अनुप राजेंद्र गोसावी, विक्की टील्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो.उ.नि प्रदीप शेवाळे हे करीत आहेत.