जळगाव (प्रतिनिधी) लग्नानंतरही दुसऱ्या महिलेशी प्रेमप्रकरण असणाऱ्या पतीने त्याच्या पत्नीचा छळ करीत माहेरुन ४५ लाख रुपये आणावे, अशी मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव तालुक्यातील भोकर येथील माहेर असलेल्या अश्विनी किरण पाटील (२२) यांचा किरण उज्जैन पाटील यांच्याशी विवाह झाला. विवाहितेने माहेरुन ४५ लाख रुपये आणावे म्हणून तिचा छळ केला जाऊ लागला. तसेच किरण पाटील यांचे दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्यानेही विवाहितेला मारहाण करण्यात येत होती. अशी फिर्याद विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पती किरण उज्जैन पाटील, सासरे उज्जैन लोटन पाटील, सासू कुसुम पाटील, नणंद व पतीची मैत्रिण यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ किरण अगोणे हे करीत आहेत.