जळगाव (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने १८ वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार केला. एवढेच नव्हे तर पिडीत तरुणीचा गर्भपात देखील केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Jalgaon Crime News)
पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार १ मे २०२१ ते १२ मार्च २०२३ या दरम्यान वेळेवेळी संशयित आरोपी हसन असलम मोमीन याने लग्नाचे आमिष दाखवून पिडीतेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे पिडीता गर्भवती राहिली. त्यानंतर हसन, त्याची आणि असलम मोमीन (रा. एरंडोल) यांनी काँफी व पपई खाल्याने गर्भपात होईल याची जाणीव असतांनाही काँफी व पपई खाऊ घालत गर्भपात केला. तसेच लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेत लग्नाची तारीख निश्चित करुन लग्नास आले नाही. या प्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि रोहीदास गभाले हे करीत आहेत.