धरणगाव (प्रतिनिधी) एरंडोल ग्रामीण रुग्नालयात आयसीटीसी विभाग व राष्ट्रविकास अॕग्रो एज्युकेशन संस्था मायग्रेन्ट टी आय प्रो. जळगाव यांच्या संयुक्त एरंडोल येथील कृष्णा हॉटेल येथील स्थलांतरीत कामगारांची जनरल चेकअप Hiv & Sti तपासणी कँम्प घेण्यात आला.
या कॅम्पसाठी डॉ. आश्विनी पाटील यांनी कामगारांना धुम्रपानाविषयी जणजागृती केली व NGO समुपदेशक अमोल सुर्यवंशी यांनी कामगारांना Hiv,sti या विषयावर थोडक्यात माहीती दिली व ictc एरंडोल समुपदेशक अंकुश थोरात यांनी कामगारांना कोविड-१९ बद्दल जनजागृती करण्यात आली. तसेच lt उमेश फुलपगारे यांच्याकडे जाऊन सर्व कामगारांनी Hiv तपासणी करून घेतली व कामगारांना मास्क वाटप करण्यात आले.