अमळनेर (प्रतिनिधी):-येथील खा शि मंडळ संचलित जी एस हायस्कूल येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांना आरोग्याची देखभाल कशी घ्यावी याबाबत डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.तसेच लहान सहान आजारांना घाबरून जाऊ नये,तसेच गंभीर आजार असल्यास योग्य औषधोपचाराने ते बरे होतात असे सांगितले.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश पाटील,डॉ नरेंद्र पाटील,तसेच औषध निर्माता गिरीश शिंदे यांनी तपासणी केली .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी एस पाटील,उपमुख्याध्यापक ए डी भदाणे,पर्यवेक्षक एस आर शिंगाणे,सी एस सोनजे,ज्येष्ठ शिक्षक के पी पाटील,आर एन साळुंखे,आर एस तेले,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.