अमळनेर (प्रतिनिधी):-येथील खा शि मंडळ संचलित जी एस हायस्कूल येथे सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी आंतरवसिता साठी आलेल्या शिक्षिका भगिनींनी सावित्रीबाईंच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा केला.अध्यक्ष स्थानी ऐश्वर्या पाटील यांनी स्वीकारले.प्रमुख वक्ते के पी पाटील,कोमल पाटील,दिपाली मोहिते तर सूत्रसंचालन अश्विनी पाटील, आभार प्रदर्शन किरण पारीक यांनी केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी एस पाटील,उपमुख्याध्यापक ए डी भदाणे,पर्यवेक्षक एस आर शिंगाणे,सी एस सोनजे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.