नशिराबाद (प्रतिनिधी) दोन मोठ्या बहिणींसोबत शेतातील झोपडीजवळ खेळत असतांना शेतातील विद्युत खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागून बावली रूमला पावरा (रा. नशिराबाद ता. जळगाव) या तीन वर्षीय चिमुकीलचा दुर्देवी मृत्यू झाला. तर तिच्यासोबत खेळणाऱ्या दोघ बहिणी बालंबाल बचावल्या. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास नशिराबाद शिवारातील शेतात घडली.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील चंदन सोपान पाटील यांचे गावालगत शेत आहे. त्यांच्या शेतात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रूमला पावरा हा तरूण आई, वडील, पत्नी आणि तीन मुलीसोबत झोपडी करून वास्तव्याला आहे. त्यांच्या झोपडीच्या शेजारुन विद्युत तरा गेलेल्या असून झोपडीच्या नजीक रूमला पावरा आणि त्याचे आईवडील त्यांची असे एकुण दोन झोपड्या आहेत. ईश्वर पावरा हा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला होता.
रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रूमला पावरा यांची सर्वांत लहान मुलगी बाबली ही आपल्या दोन मोठ्या बहिणीसोबत झोपडीजवळ खेळत होती. त्यावेळी शेतातील लोखंडी खांब्यात विजेचा प्रवाह उतरलेला होता. त्यावेळी बावली ही खेळत असतांना तिचा विजेच्या खंबल्याला धक्का लागला. त्यावेळी विजेचा धक्का लागल्याने तीचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. तिच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.