जळगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लखपती दिदी कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी दि. २५ ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांची सभा विमानतळासमोरील इंडस्ट्रीयल पार्क येथे होणार आहे. त्यांच्या सुरक्षेसह रहदारीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक मार्गात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय लखपती दिदी कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी दि. २५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिल्हा दौऱ्यावर येत आहे. विमानतळा समोरील इंडस्ट्रीयल पार्क येथे त्यांची सभा होणार असून या सभेसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. सभा स्थळ हे जळगाव ते छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्ग ७५३ वर असल्यामुळे महामार्गावरील रहदारीचे नियमन व कायदा व सुव्यवस्था निर्माण होवू नये. म्हणून शहरासह जिल्ह्यातील वाहतुक मार्गात तात्पुरस्त्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना असलेल्या मंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ३३(१) (बी) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन वाहतुक मार्गात बदल करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.
पंतप्रधान मोदी यांचे सभा स्थळ महामार्गावर असल्यामुळे अजिंठा चौफुली ते विमानतळ, विमानतळ ते नेरी ता. जामनेर पर्यंत हा मार्ग आत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व प्रकारच्या अवजड व हलक्या वाहनांना वाहतुकीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
महामार्ग वाहतुकीसाठी बंद असलेल्यांसाठी जळगावकडून नेरी, पहूर, छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी जळगाव- शिरसोली-वावडदामार्गे नेरी या मार्गाचा वार करावा. छत्रपती संभाजी नगर, पहूर, जामनेरकडून येणाऱ्या वाहनांसाठी नेरी वावडदा, शिरसोलीमार्गे जळगाव या मार्गाचा वापर करावा. नेरी, गाडेगाव, उमाळा, चिंचोली, देव्हारी, करमाड, पळासखेडे, जळके (तांडा) या गावाकडून जळगावकडे येणाऱ्या वाहनांसाठी वावडदा, शिरसोली मार्गे जळगाव या पर्यायी मार्गावा वापर करावा.