अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर येथील अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ,शिक्षण विभाग पंचायत समिती,अंमळनेर आणि युनियन बँक ऑफ इंडिया, शहादा च्या वतीने भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हिंदी दिवसानिमित्त तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेचा आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये तालुक्यामधून 45 माध्यमिक शाळेच्या 2602 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्याचबरोबर जवळपास 53 हिंदी शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले. या स्पर्धेचा निकाल नुकताच कार्यकारणीच्या बैठकीत जाहीर झाला. तो याप्रमाणे
ग्रामीण भागातील मोठ्या गटातून
प्रथम प्रतीक्षा अरुण पाटील ( आबासाहेब एस एस पाटील माध्यमिक विद्यालय लोंढवे ), द्वितीय पियुष ज्ञानेश्वर महाजन ( शारदा माध्य. उच्च माध्य. विद्यालय, कळमसरे ),तृतीय कल्याणी तुकाराम बाविस्कर (आदर्श माध्य. उच्च माध्य. विद्यालय जळोद – अमळगाव), उत्तेजनार्थ(1) वंशिका प्रदीप बाविस्कर, (बालाजी विद्यालय गांधली- पिळोदे), उत्तेजनार्थ (2) नंदिनी दिलीप पाटील (एकात्मता माध्यमिक विद्यालय,शहापूर ), उत्तेजनार्थ (3) तेजल किरण कोळी (के. पी. सोनार हायस्कूल, जैतपीर)
ग्रामीण भाग -छोटा गट – प्रथम खुशी हेमलाल कुंभार (दत्त माध्यमिक विद्यालय,पातोंडा) द्वितीय प्रदीप मुकेश शेवाळे (सरस्वती माध्यमिक विद्यालय, पाडसे) तृतीय गौरव प्रकाश कोळी (आदर्श माध्य. व उच्च माध्य. विद्यालय अंमळगाव)
उत्तेजनात (1) तुषार रायसिंग राणे ( माध्यमिक विद्यालय रणाईचे ),2- जानवी अमोल पाटील (पं.नेहरू माध्य. विद्यालय फाफोरे), 3- कुणाल जगदीश पाटील (उदय माध्यमिक विद्यालय, झाडी) शहरी विभाग मोठा गट प्रथम निखिल प्रवीण ठाकरे (साने गुरुजी नूतन माध्य. विद्यालय, अमळनेर), द्वितीय सारंग तुषार देवरे (सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूल, अमळनेर), तृतीय भक्ती योगेश खैरनार (साने गुरुजी कन्या हायस्कूल,अमळनेर), उत्तेजनार्थ 1) आनंदी परेश पुरभे( न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, अंमळनेर),2) निलेश ज्ञानेश्वर मोरे (विजय नाना पाटील आर्मी स्कूल अमळनेर)3)प्रणव मुरलीधर भोई (लोकमान्य विद्यालय अमळनेर) शहरी विभाग छोटा गट प्रथम कौशल जगदीश पाटील (ऍड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर), द्वितीय समीक्षा अभय बिऱ्हाडे,तृतीय शिवम त्रिपाठी (सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूल, अंमळनेर),
उत्तेजनार्थ 1)सारंग विजयसिंह पाटील (पी बी ए इंग्लिश मिडीयम स्कूल,अंमळनेर),2)प्रतीक्षा जयवीर पाटील (सावित्रीबाई कन्या माध्य.विद्यालय,अंमळनेर) 3) अक्सा कय्युम खाटीक ( अल-फैज गर्ल्स उर्दू स्कूल,अंमळनेर)
याप्रमाणे निकाल घोषित करण्यात आलेला आहे. निबंधाच्या परीक्षणासाठी प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या हिंदी विभागाच्या प्रा.डॉ. कल्पना पाटील यांनी ग्रामीण विभागाच्या निबंधांचे परीक्षण केले. तर शहरी विभागाच्या निबंधांचे परीक्षणाचे कामकाज प्रा.सोपान भवरे यांनी पाहिले.
यासोबतच हिंदी निबंध स्पर्धा व इतर हिंदी विषयाच्या स्पर्धांचे आपल्या शाळेत आयोजन करणाऱ्या 53 हिंदी शिक्षकांना ‘कृतिशील हिंदी अध्यापक’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या हिंदी निबंध स्पर्धेसाठी 43 शाळेच्या हिंदी शिक्षकांनी आपआपल्या शाळेतून 2 उत्कृष्ट निबंध मंडळाकडे परीक्षणासाठी पाठवले होते त्या तालुक्याभरातल्या १४२ विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन पर पारितोषिक देण्याचा निर्णय हिंदी अध्यापक मंडळाने घेतला आहे. या तालुका स्तरीय स्पर्धेच्या आयोजनासाठी युनियन बँक ऑफ इंडिया,शाखा :शहादा चे वरिष्ठ प्रबंधक श्री मयूर पाटील साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच गटशिक्षणाधिकारी श्रीमती शर्मिला चव्हाण यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले आहे. स्पर्धेतील उर्वरित सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण शाळेच्या द्वितीय सत्राच्या सुरुवातीला करण्यात येईल असे मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी सांगितले.
या तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेला यशस्वीतेसाठी मार्गदर्शक दिपक पवार, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनीष उघडे,नारायण चौधरी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्सुलकर,सचिव दिलीप पाटील, सहसचिव कमलाकर
संदानशिव, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रसिद्धीप्रमुख ईश्वर महाजन, प्रतियोगिता समिती सदस्य मुनाफ तडवी, प्रदीप चौधरी, ज्येष्ठ सदस्य डॉ. किरण निकम, श्रीमती कविता मनोरे श्रीमती योगेश्री पाटील, प्रशांत वंजारी, जितेंद्र बाविस्कर या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. निबंध स्पर्धेतील सर्व विजेता विद्यार्थ्यांचे अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.