नांदेड ता. धरणगाव (दीपक भोई) येथील घरकुल वंचितांसाठी ग्राम पंचायतच्या पुढाकाराने जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जागेची गुरुवारी (दि.११ नोव्हेंबर) घरकुल वंचितांनी प्रत्यक्ष पहाणी केली.
यावेळी येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी व प्रधानमंत्री आवास योजना यादीत मंजूर झालेल्या घरकुलासाठी शासकीय गट क्र. १६४१ मधील जागा उपलब्ध करून करून देण्यात आली आहे. घरकुलासाठी यादीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी स्वतःची जागा उपलब्ध नसलेले ९५ लाभार्थ्यांचे जागा मिळण्यासाठी अर्ज उपलब्ध झाले होते. ही बाब लक्षात घेऊन जि. प. सदस्या माधुरी चंद्रशेखर अत्तरदे, गटविकास अधिकारी स्नेहा पवार, सरपंच पुनम प्रशांत अत्तरदे, सुनील भदाणे आणि ग्रा. प. सदस्य, अतुल बऱ्हाटे, क्लार्क योगेश शिरसाठ व ग्रा प कर्मचारी यांनी सदर जागा उपलब्ध करून दिली. त्याठिकाणी ग्रा. प. कडून वीज, पाणी, खांबा व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जागेचे सपाटीकरणाचे नुकतेच सुरु झाले आहे.