धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री महावीर बंद सोसायटी बँकेचा भरणा रक्कम घेऊन जात असताना रस्त्यात काही अज्ञात चोरी करण्याच्या उद्देशाने रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वतःच्या जिवावर खेळून सागर बडगुजर यांनी संस्थेची रक्कम वाचवली म्हणून संस्थेतर्फे त्यांचा शाल श्रीफळ ड्रेस व ५००० रुपये रक्कमचा धनादेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष अजय शेठ पगारिया, सी. एस. पाटील, अध्यक्ष डॉ. मिलिंद डहाळे, अजित डहाळे, प्रवीण कुमट, अरविंद ओस्तवाल, संजय ओस्त वाल, राजु भाटिया आदी उपस्थित होते.