धरणगाव (प्रतिनिधी) जोशाबा सामाजिक संस्थेतर्फे जवखेडे तालुका धरणगाव येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते विलास पवार यांची ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याने त्यांचा गटशिक्षणाधिकारी अशोक बिर्हाडे, संस्थेचे सचिव कैलास पवार यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
विलास पवार हे ग्रामीण भागात फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करण्याचे काम करून दीनदुबळ्यांना न्याय मिळवण्यासाठी धडपड करीत असतात. यावेळी कार्यक्रमास दीपक पाटील, लोखंडे, पाटील, सैंदाणे उपस्थित होते. सुत्रसंचालन कैलास पवार यांनी केले.